माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेनातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश व महिलांना साड्यांचे वाटप

वैजापूर ,​४​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूरचे माजी आमदार, लोकनेते स्व.आर.एम.वाणी यांच्या जन्मदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता.04) आ. बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम  आमदार रमेश पाटील व माजी नगराध्यक्ष साबेर खान  यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके, शहरप्रमुख सुप्रियाताई व्यवहारे, युवासेना जिल्हासमन्वयक अमीर अली, युवासेनेचे तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, कय्युमशेठ सौदागर, भाऊसाहेब बारहाते, गोटुभाऊ राजपूत, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, सुनील पोळ, प्रकाश मतसागर, महेश बुणगे, सोमनाथ भराडे, सलीम वैजापुरी, नगरसेवक प्रिती भोपळे, बिलालभाई सौदागर, स्वप्निल जेजूरकर, इम्रान कुरेशी, डॉ.निलेश भाटिया, विभागप्रमुख प्रभाकर  जाधव, नानासाहेब थोरात, बंडू जगताप, डॉ. संतोष गंगवाल, रावसाहेब मोटे, रामनाथ तांबे, प्रमोद कुलकर्णी, विठ्ठल पगार, अमोल बोरणारे, शंकर मुळे, कमलेश आंबेकर, अक्षय कुलकर्णी, राजवीर त्रिभुवन, अशोक जगताप, वल्लभ सोनवणे, राजू कहाटे, भगवान साठे, निखिल वाणी, वाल्मीक जगताप, गणेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.