वैजापूर पालिकेतील 46 कर्मचाऱ्यांना नगरसेविका व त्यांच्या पतीकडून दिवाळी भेट

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नगरपालिकेचे सेवेत स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभागात नियमित कर्तव्य बजावणारे प्रभाग क्रमांक अकरामधील 46 रहिवासी कर्मचारी कुंटुबांची भाजपचे शहराध्यक्ष दिनेश शंकरसिंह राजपूत , नगरसेविका जयश्री राजपूत यांचे एकत्रित पुढाकाराने दिवाळी गोड करण्यात आली. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या हस्ते 46 कर्मचा-यांच्या कुंटुबांला विठ्ठल – रुक्मिणीची आकर्षक मुर्तीसह मिठाई फराळ आणि काही प्रमाणात आर्थिक रक्कम सप्रेम भेट देऊन त्यांची सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

प्रभागातील नागरी सेवां सुविधा कामे सांगणा-या नगरसेवक कुंटुबांने उत्सवाच्या धामधुमीत दखल घेऊन आपुलकीने सन्मान केल्यामुळे पालिकेचे कर्मचारी भारावून गेले होते. प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे नगरसेविका जयश्री राजपूत, शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी नगरपालिका सेवेत कार्यरत त्यांचे प्रभागातील चतुर्थ श्रेणीतील तब्बल 46 कुंटुबांना त्यांनी दिवाळीचा फराळ आणि छोटीशी आर्थिक भेट देण्याचा उपक्रम क्रांती जिम येथे शनिवारी दुपारी पार पडला.नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या हस्ते घंटागाडीचे माध्यमातून नागरी भागात कचरा संकलक, दिवा बत्ती तसेच शहरात सार्वजनिक परिसराची दररोज साफसफाई करणा-या 46 कर्मचा-यांचे कुंटुबांची भेटवस्तू देऊन त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सामाजिक भावनेतून गौरव करण्यात आला.नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी राजपूत दांपत्यानी राबवलेल्या उपक्रमाची प्रशंसा करुन वर्षभर सेवा देणा-या कर्मचा-यांचा सन्मान केल्यास त्यांची कर्तव्यदक्षता आणखी दृढ होईल असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला राजेश गायकवाड, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोंदे, शहर उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, नगरपालिकेचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक विष्णू आलुले, प्रमोद निकाळे स्वच्छता कर्मचारी अहमद ,चेतन निखाडे, गणेश टिंभे, तुरे मामा, गवळी मामा,बाळू बागुल व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

सेवा क्षेत्रातील कर्मचा-यांचा सन्मान. शहराध्यक्ष दिनेश राजपूत

पालिकेचे चतुर्थ श्रेणीत कर्मचारी नागरी भागात फिल्डवर कामे करुन लोकांना सुविधा देण्यासाठी सदैव कार्यरत असतात आम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधे पालिका सेवेत कार्यरत 46 कर्मचारी कुंटुबांना आमच्या कडून प्रेमाची स्नेह भेट देऊन त्यांचा सन्मान करण्याची भुमिका बजावल्याचे समाधान लाभल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी व्यक्त केली.