महाॲडव्हांटेज एक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे

महाॲडव्हांटेज एक्स्पोच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

औरंगाबाद,४ जानेवारी  / प्रतिनिधी :-शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित   ‘महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोला’ जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली.5 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे या एस्पोचे उद्घाटन होणार आहे.

पाहणी केल्यानंतर प्रदर्शनाचे अतिशय काटेकोर नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक देखील केले .यावेळी पाण्डेय यांनी ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी,मसिआचे अध्यक्ष किरण जगताप आदीसोबत प्रदर्शनातील इलेक्ट्रॉनिक ट्रांसफार्मर, सूर्या लाईट, मॅजिक इंडस्ट्रीज, प्री इंजीनियरिंग बिल्डिंग, काँक्रेट रोड कटिंग मशीन आदीसह विविध स्टॉलची पाहणी केली.