“मी खून केला” :लग्नाचा तकादा लावल्यामुळे शिऊर येथील पत्रकाराने केली प्रेयसीची हत्त्या

वैजापूर,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील पत्रकाराने प्रेयसीने लग्नाचा तकादा लावल्यामुळे गळा चिरून तिची हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ लाखे असे या पत्रकाराचे नाव आहे तर अंकिता श्रीवास्तव असे या घटनेत मृत पावलेल्या प्रेयसीचे नाव आहे. 

औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नर येथील डीमार्ट जवळ एका खोलीत प्रेयसीचा खून करून मृतदेह गाडीत घेऊन जात असताना देवगाव रंगारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.सौरभ आणि अंकिता हे दोघेही विवाहित असून शेजारी शेजारी  राहतात. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. सौरभकडे अंकिता सतत लग्नाचा तकादा लावत होती त्यामुळे रागाच्या भरात सौरभने अंकिता हिचा गळा चिरून तिची हत्त्या केली. अंकिता हिची हत्त्या केल्यानंतर सौरभ हा तिचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाला असताना देवगाव रंगारी पोलिसांनी त्याला पकडले. सौरभने अंकिता ची हत्त्या केल्यानंतर “मी खून केला” असल्याची पोस्ट पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली होती.

पतीपासून विभक्त असलेल्या जालन्याच्या तरुणीचा औरंगाबादमध्ये क्रूरपणे खून केल्याचे समोर आले आहे.​​ अंकिता श्रीवास्तव असे त्या तरुणीचे नाव असून, अत्यंत थंड डोक्याने तिचा मित्र सौरभ बंडोपंत लाखेने (वय 35) तिला संपवल्याचे समजते.खुनाचे बिंग फुटु नये म्हणून त्याने अंकिताच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून चारचाकी गाडीने तो नेत होता. अखेर हे कृत्य शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर बुधवारी (ता. 17) खुनाचा उलगडा झाला.

खुनाचे बिंग फुटताच सौरभ स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला. तत्पूर्वी त्याने आपल्या गुन्ह्याची एका व्हाॅट्सअ‌ॅप ग्रुपवर दिल्याचेही समजते.खुनाचा प्रकार 13 ऑगस्टला घडल्याचे समोर येत असून, आज सकाळी अंकिताच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. हडको येथील डी मार्ट समोरील घरामध्ये ही घटना घडली.शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी सौरभच्या खोलीजवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सौरभ अंकिताच्या मृतदेहाचे अवशेष पोत्यात घालून नेत असल्याचे दिसून आले.

काय आहे प्रकरण?

मूळ जालनाची असलेली अंकिता हिचा महेश श्रीवास्तव यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अंकिता व मारेकरी सौरभ शिवूरमध्ये एकाच परिसरात वास्तव्यास होते. तेथेच त्यांची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाची कुटुंबांना कुणकुण लागली व त्यानंतर वादाला सुरुवात झाली. त्यामुळे अंकिता एक दिवस अचानक सासर सोडून बेपत्ता झाली.

सासर सोडल्यानंतर काही दिवसांनी अंकिता माहेरी परतली. मागील दोन महिन्यांपासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबाद येथे खोली घेऊन भाड्याने राहत होती. तिला अनेकदा भेटायला येणारा सौरभ दोन ते तीन दिवसांपूर्वीही भेटायला आला. त्याच दरम्यान त्याने तिचा क्रूरपणे खून केल्याचे समजते . शेजाऱ्यांच्या माहितीनुसार मागील चार ते पाच दिवसांपासून अंकिता खोलीच्या बाहेर आली नव्हती.त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला.अंकिता खोलीतून बाहेर येत नव्हती, तर सौरभ खोलीतून पोत्यात भरून काही तरी नेत होता. ही बाब शेजाऱ्यांना खटकली. बुधवारी सौरभ इनोव्हा गाडीमध्ये आला. एका पोत्यामध्ये तो काहीतरी घेऊन जात असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. यानंतर त्यांनी सौरभवर संशय व्यक्त करीत ही बाब सिडको पोलिसांना कळवली. पोलिसांनी धाव घेतली असता अंकिताच्या खोलीत वाळलेले रक्त आढळले.

स्वतःच गेला पोलिसांना शरण

पोलिसांनी इनोव्हाबाबत माहिती आणि गाडीचा क्रमांक जिल्ह्यातील सर्व पोलिसांना पाठवून नाकाबंदी लावण्याची सूचना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. परंतु त्यापूर्वीच सौरभ पोलिसांसमोर हजर झाला. दुसरीकडे सिडको पोलिसांनी तत्काळ अंकिताच्या कुटुंबाशी संपर्क साधून माहिती घेणे सुरू केले आहे.सौरभने अंकिताचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केला, याचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. मात्र, खून केल्यानंतर स्वतःला साप्ताहिक पत्रकार म्हणणाऱ्या सौरभने मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘हो मी खून केला’ अशी जाहीर कबुली दिली आहे.