वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदी परिसरातील सराला बेटाचा निसर्गरम्य परिसर

वैजापूर,​६​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसर निसर्गरम्य वातावरण व रमणीय झाला आहे. या परिसरात औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सरला बेट हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भुप्रदेश निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरला आहे. त्यामुळे सरला बेटाला केवळ धार्मिक स्थळ म्हणुनच नाही तर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणुन अनन्यसाधारण महत्व आहे. 
सराला बेटाचा ‘नेकलेस व्ह्यु
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर या दोन तालुक्यांची सीमारेषा असलेल्या श्री क्षेत्र सराला बेटाचा परिसर बघितल्यानंतर नेकलेस व्ह्यु बघितल्याचा अनुभव येतो.  या भागात पर्जन्यमान कमी असते. त्यामुळे गोदावरीत हवे तेवढे पाणी पाहायला मिळत नाही. पण गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा चोहोबाजूंनी पाणीच पाणी झाले आहे. जानेवारी-फेब्रुवारीत तर असे दृश्य दिसणे दुर्मिळच. पण पाच वर्षांनंतर यंदा मात्र डोळ्याचे पारणे फिटले असा गोदाकाठचा “नेकलेस व्ह्यू’ निसर्ग सौंदर्यात भर घालत आहे.

सर्व धर्म समभावाचे प्रतीक 
वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगावचे भुमिपूत्र सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीकाठी सराला बेटाचा विकास केला. सामाजिक व धार्मिक कार्याचा वसा हाती घेतलेल्या वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांचे आजोबा रुपचंदशेठ संचेती यांनी गोदावरी नदीकाठची ६५ एकराचा सुपिक भूभाग गंगागिरी महाराजांना भेट दिला. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून निजामशाहीच्या जुलमी राजवटीत अन्यायाची वेदना सोसणाऱ्या लोकांना संघटित करण्याचे काम त्यांनी केले.

पावणे दोनशे वर्षांची सप्ताहाची परंपरा
श्रद्धेय गंगागिरी महाराज यांना शिर्डीचे साईबाबा गुरूस्थानी मानत होते. गंगागिरी महाजारांनी लोकसहभागातून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली. व्यसन मुक्त समाज, अस्पृश्य निर्मलून कार्यक्रम, विविध गावातून भाकरी जमा करून त्या एकत्रित केल्या जातात. आमटी व भाकरी पंगत ही सप्ताहामधील अन्नदानाचा प्रमुख आहार असतो. पावणे दोनशे वर्षपूर्तीच्या दिशेने सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. स्व.नारायण गिरी महाराज यांनी सराला बेटाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली. त्याच्यानंतर मंहत रामगिरी यांनी सराला बेटात भव्य समाधी स्थळाची उभारणी केली. गंगागिरी महाराजांसह इतर महंतांचेही समाधी मंदिर बेटावर आहेत. मराठवाडा व नगरसह आजुबाजूच्या जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड यांनी सप्ताहाची दखल घेण्यात आली आहे.

शनिदेव गाव

गोदावरी नदीच्या काठी वसलेले आणखी एक गाव म्हणजे शनिदेव गाव. हे गाव केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले या पवित्र गोदावरी नदीच्या कुशीत. श्री शेत्र शनिदेव गाव तालुका वैजापूर हे गाव वसले आहे. वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या १७ गावांपैकी शनिदेव गाव हे गाव असून गंगापुर तालुक्याच्या सीमेवर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भगवान शनि देवाची साडेचार फुटाची काळी शाळा असून  तेथे शनिदेवाची शक्ती जागृत  असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे दैवत फार प्राचीन असून पूर्ण त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे बोलले जाते. गावकर्‍यांनी वेळोवळी भगवान शनिश्वराचे  वेळोवळी अनेक चमत्कार. अनुभव आल्याचे भाविक सांगतात. अलिकडे अगदी चार ते पाच वर्षात महंत रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व क्षणी भक्तांच्या सहकार्याने या  परिसराचा केवळ  धार्मिक स्थळ म्हणूनच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा  प्रयत्न होताना दिसत आहे.

गोदावरी नदीच्या काठावर असल्याने या परिसराला निसर्गसंपदा भरपूर प्रमाणात लाभली आहे. मी योग्य नियोजन करुन वृक्षारोपण व फुलझाडांची लागवड केलेली आहे.  राजस्थान येथून दगडी फरशी आणून  शनि देवासाठी ५० बाय ५० चा भव्य चौथारा उभारला आहे.  त्यावर लोन सही विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणी संस्थांचे स्वतंत्र कार्यालय असून  भाविकांसाठी प्रशस्त असे प्रसादालय सुद्धा आहे. प्राचीन कोरीव शिळा वापरून ८० किलोच्या घंटेसाठी बनवलेली कमान सर्वांचे लक्ष वेधून घेते. चौथा आणि परिसरातील रंगीत विद्युत रोषणाई  यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी अधिक मनमोहक भासतो. गेल्या काही वर्षापासून प्रत्येक शनिवारी शनी भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे व्यवस्था करत आहेत. त्यामुळे केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नाही तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी देखील येथे भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत आणि दिवसेंदिवस ही स्थान एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे.  या ठिकाणी अन्नदाना सोबतच प्रवचनातून ज्ञानार्जनाचे कामही केले जाते. शनि अमावस्या ला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच शनि जयंती चाही मोठा कार्यक्रम घेण्यात येतो. शनी ग्रह हा वायु तत्वांचा असुन मनुष्याला आसक्तीकडुन विरक्तीकडे नेतो. तो मानवाला जीवनातील मान अपमान  आणि अवहेलना यातुन परमार्थाकडे वळवतो असे मानले जाते. हा पुर्व सुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा गृह असल्याने  दर्शनाचा लाभ घेण्यासाठी श्रीक्षेत्र शनिदेवगाव या ठिकाणी  एक वेळ अवश्य भेट द्यावी. असे आवाहन येथील विश्वास यांनी केले आहे. बोरी नदीच्या काठावर असल्याने शनिदेव गावचा विकास पार्टी करण्यासाठी. मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात एक सुंदर पर्यटन स्थळ बनवण्यात येईल. मुलांसाठी गार्डन, खेळणी, तळे, भव्य स्टेज, घाट, बोटींग   याही कामांचे नियोजन आहे अशी माहिती व्यवस्थापकांनी दिली.