दर्जेदार शिक्षण संस्थांची ग्रामीण भागात गरज – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था ग्रामीण भागात येत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रगतीची शिखरे गाठावीत असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
वैजापूर येथे नगरसेवक नगरसेवक प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकारातुन सुरु झालेल्या खासगी शिक्षण वर्गाच्या शाखेचे उद्घाटन अंबादास दानवे व पंढरीनाथ चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले पुर्वी मेडिकल, इंजीनियरिंग या शाखेकडे जाणारे विद्यार्थीच खासगी शिकवणी लावत असत. हे शिकवणी वर्ग देखील मोठ्या शहरात असत.शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने अनेक संस्था नावारूपाला आल्या आहेत.शहरात शिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्था आता ग्रामीण भागातही आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.या खासगी वर्गामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असल्याने चांगले करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.यापुढे नविन शैक्षणिक धोरण सरकार आणत आहेत.या धोरणात विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासून कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिल शहाणे यांनी केले.या वेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिवसेना सह संपर्क प्रमुख ॲड आसाराम रोठे, शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक प्रकाश चव्हाण, माजी नगराध्यक्षा बाळासाहेब संचेती,बन्सल क्लासचे उपाध्यक्ष कैलास घुगे, विशाल संचेती, ॲड प्रमोद जगताप,अकिल शेख, गटविकास अधिकारी एच आर बोयनर, साहेबराव औताडे, प्रकाश बोथरा, मनोज गव्हाणे, मनोज गायके,प्रा बी पी सिंग राकेश चांडक,बारस्कर,अक्षय साठे, बाळासाहेब तिपायके,रियाज शेख, उल्हास ठोंबरे,कैलास तुपे,निलेश भाटिया,मनाजी मिसाळ आदींसह नागरीकांची​ उपस्थिती ​होती.