“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत फिरते न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- “न्याय आपल्या दारी”  उपक्रमांतर्गत फिरते न्यायालयाचे उदघाटन वैजापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्यीन एम.ए. यांच्या हस्ते बुधवारी(ता.14) झाले.आजपासून फिरते विधी न्यायालय अर्थात विधी साक्षरता गंगोत्री वैजापूर तालुक्यात सुरू होत असून गावागावातून याचा मार्ग राहणार आहे  ता.14 व 15 सप्टेंबर यादिवशी नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

या विधीसेवा साक्षरतेचे महत्व असे आहे की आपल्यामधील वाद, भांडण तंटा जो आहे तो आपल्या गावाच्या वेशीमध्ये थांबला पाहिजे. वेशीच्या बाहेर येता कामा नये यासाठी गावातील तंटामुक्त समितीने याकरिता पुढाकार घेऊन सामंजस्याने  तडजोडीने सोडवला पाहिजे जेणेकरून न्यायालयावरील ताण कमी होऊन गावं गुण्यागोविंदाने एकमेकासोबत राहतील.या प्रसंगी दुसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एम. नेरलीकर व महिला न्यायदंडाधिकारी डी. एम. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वैजापूर तालुका विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए यांचे मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुक्यातील घायगाव व जातेगाव (टेंभी) बुधवारी (ता.14) झाले.  या फिरते न्यायालयात शेतकरी शेतमजूर महिलांना तसेच गोरगरीब अनुसूचित जाती व जमाती व दिव्यांग व्यक्ती यांना कायदेविषयक जनजागृती व्हावी व कायद्याचे जुजबी ज्ञान व्हावे याकरिता विविध कायदे विषयक माहिती देण्यात आली.

वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अँड प्रमोददादा जगताप, अँड. प्रविण साखरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. अँड. सोपान पवार, यांनी नालसा समिती 2015 बाबत सखोल मार्गदर्शन केले. अँड प्रदीप चंदने, अँड शरद हारदे, अँड एकनाथ कुंजीर यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले.वकील संघाचे अध्यक्ष अँड. किरण त्रिभुवन यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायदे विषयक माहिती देऊन अध्यक्षीय समारोप केला तर आभार प्रदर्शन  सचिव अँड. वैभव ढगे यांनी केले.या वेळी उपाध्यक्ष अँड. व्हि. जी. वाघ, अँड. मजहर बेग, अँड. अमोल भुसारे न्यायालयीन कर्मचारी बाबासाहेब मोरे, एस. आर. मांडवे व गावातील सरपंच भाऊसाहेब बनसोडे,  साहेबराव पवार, सुनिल पवार,  माधव पाटील, बाळु साळुंके, साईनाथ गवळी, सागर गायकवाड, दादासाहेब गायकवाड, अशोक साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते