शालेय विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरणाला वैजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

वैजापूर,५ जानेवारी /प्रतिनिधी :- 15 ते 18 या वयोगटाच्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला वैजापूर शहर व तालुक्यात सुरुवात झाली असून या लसीकरणाला विद्यार्थ्यांकडून  उत्स्फूर्त मिळत आहे.   

वैजापूर शहरातील न्यू हायस्कूल या शाळेत बुधवार रोजी नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने विद्यार्थिनीचे लसीकरण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे श्याम उचित आणि गौरव सिरसाट यांनी लसीकरण केले. लसीकरणाला विद्यर्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिला.शाळेचे मुख्याध्यापक व्ही.डी. सोनवणे, स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, नगरपालिकेचे पर्यवेक्षक एम आर.गणवीर यांनी विद्यार्थ्यांना कोरोना विषयी माहिती देऊन लसीकरण किती महत्वाचे आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.

शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात कोविड लसीकरण करून घेतले. याप्रसंगी शिक्षक सतीश जाधव, संभाजी आहेर, श्रीवास्तव एम, श्रीमती केरे , अनिल पाटील, अशोक शिंदे यांनी सहकार्य केले. संदीप शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्याचे काम केले.शहरातील अन्य  शाळेत ही कोविड लस घेण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन लसीकरण करण्यात येत आहे.शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोविड लस घ्यावी व पालकांनीही आपल्या पात्र पाल्याचे लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य करावे असेआवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.