पाच लक्ष रुपये खर्चाच्या वरखेड जिल्हा परिषद शाळेच्या तार कुंपण व प्रवेशद्वार कामाचे ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर विधानसभा मतदार संघातील मौजे वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामविकास विभागांतर्गत मंजूर झालेल्या 5 लक्ष रुपये तारकुंपण व प्रवेशद्वार कामाचे उदघाटन सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्याहस्ते रविवारी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, गंगापूरचे शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील कानडे, माजी तालुकाप्रमुख अंकुश सुंब,उपतालुकप्रमुख बाळासाहेब चव्हाण,उपसभापती महेंद्र पाटील गंडे,पंचायत समिती सदस्य बद्रीभाऊ चव्हाण,भानुदास पवार, युवासेनेचे पांडुरंग कापे,अभिषेक मनाळ,अय्युब पटेल,साईराम राऊत,ऋषिकेश मनाळ, कल्याण बारहाते, महेश मनाळ, राजू हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.