वैजापूर शहरात पालिका प्रशासन जागल्याच्या भूमिकेत, कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :-कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पालिका प्रशासन ‘एक्शन मोड’ मध्ये असून, नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी आज कर्मचारी व पोलिसांसह रस्त्यावर उतरून शहरातील भाजीमंडी ,मुख्य बाजार पेठ व रस्तावरील  दुकानदार यांना कोविड लसीकरण करून घेणे, मास्क वापरणे, अंतर पाळणे यासारख्या सूचना देऊन कोरोना नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा त्यांनी इशारा दिला. सर्व शहरभर फिरून नागरिकांना कोविड लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पेट्रोलपंप ग्राहकांनाही “नो मास्क, नो पेट्रोल” असे आदेश दिले. प्लस्टिक पिशव्या स्वतः जप्त करून प्लॅस्टिक वापरू नका नसता दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वतः माईकवरून देऊन कोविडला संपविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.त्यांच्यासमवेत स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, कर निरीक्षक मिलिंद,साळवे, भांडरपाल वाल्मिक शेटे, स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन ,महादेव करपे, व पोलिसांसह स्वच्छता विभागातील 25 कर्मचाऱ्यांचा ताफा होता.शहरात कोविड रुग्ण वाढत आहेत याबाबत सर्व नागरिकांनी जागृत होऊन शासनाच्या व प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले आहे.