लोणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात

वैजापूर,३१ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक शाळेवर कार्यरत असणारे भाऊसाहेब शिंदे हे सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवारी (ता.29) पार पडला. त्यांनी आपल्या आयुष्यात 34 वर्ष सेवा केली.

ही सेवा त्यांनी अतिशय प्रामाणिक व चोखपणे पार पडली त्यांच्या या सेवेच्या कार्यकाळात त्यांना अनेक प्राविण्यपूर्वक वेतनवाढी देखील मिळाल्या, दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांनी जिल्हा परिषद भायगाव शाळा आपल्या कार्यकाळात आय.एस.वो मानांकित देखील केली होती त्यांचे विद्यार्थ्यांचे व सगळ्या शिक्षकांचे अगदी मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे आपण एका चांगल्या शिक्षकाला मुकलो अशी भावना कार्यक्रमस्थळी सर्वांची होती.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, एकनाथराव जाधव, अजय चिकटगावकर , प्रशांत शिंदे, गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, बाळासाहेब मस्के, केंद्रीय मुख्याध्यापक विलास शिहरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख अशोक पगारे यांनी केले  आभार सरपंच गणेश इंगळे यांनी मानले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे,  माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, सभापती भागिनाथ मगर, मनाजी मिसाळ, गटनेते प्रकाश चव्हाण, दिनकर पवार, पंकज ठोंबरे, सचिन वाणी, राजेंद्र मगर, सुरेश राऊत, साईनाथ मतसागर, रिखबचंद पाटणी, उत्तम निकम , मंजाहरी गाढे, शैलेश सुराशे बाळासाहेब भोसले, संचालक ज्ञानेश्वर जगताप, सुभाष आव्हाळे,नगरसेवक पारस घाटे, दिनेश राजपूत, ज्ञानेश्वर टेके, शिवलिंग आप्पा साखरे, शहरअध्यक्ष प्रेम राजपूत, नंदकिशोर जाधव,प्रकाश मतसागर, अमृत शिंदे, अक्षय साठे, अमोल बावचे, राहुल साळुंके, राजीव साळुंके, प्रदीप सरोवर आदींची प्रमुख उपस्थिती होतीकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व लोणी बु शाळेचे शिक्षक एकनाथ शिंदे , सय्यद ,दुशिंग ,भालेकर   व आघुर केंद्रांतर्गत शिक्षकांनी मेहनत घेतली.