वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मका खरेदी केंद्राचा आ. बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :-कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर येथे शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आला.

Displaying IMG-20220111-WA0123.jpg


भरडधान्य मका खरेदीसाठी जिल्ह्यांत सर्वात जास्त वैजापुर तालुक्यासाठी 37 हजार 482 क्विंटल उद्दीष्ट दिलेले असून आतापर्यंत 470 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हेक्टरी 23 क्विंटल 97 किलो प्रमाणे मका प्रती क्विंटल 1870 रुपये दराने खरेदी केली जाणार आहे.
शेतकर्‍यांच्या भरड धान्याला चांगला दर मिळण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उपयोगी ठरणार असून याची अंतीम तारीख 31 जानेवारी 2022 पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपली मका विक्रीसाठी आणुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.बोरणारे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विष्णूभाऊ जेजुरकर, संचालक कैलास बोहरा, मंजाहारी गाढे, प्रभारी तहसीलदार मनोहर वाणी  महेंद्र गिरगे, सचिव विजय शिनगर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख वसंत त्रिभुवन, उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके, अनिल चव्हाण, बाबासाहेब पाटील काळे, पिंटूशेठ मुंगी, विलास पवार, चंचल मते व शेतकरी उपस्थित होते.