औरंगाबाद जिल्ह्यात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46007 कोरोनामुक्त, 279 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 42, ग्रामीण 10) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46007 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47529 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1243 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (65) देवगिरी इंजिनियरिंग कॉलेज (2), वेदांत नगर (1), उस्मानपूरा (2), सिडको एन-4 (7),बीड बायपास (3),एन-11 हडको (1), एन-3 सिडको (2), बेगमपुरा (1), हनुमान टेकडी (1), कमलनयन बजाज हॉस्पीटल, मुलींचे वसतीगृह (1), सातारा परिसर (1), पी.डब्ल्यू.डी. कॉलनी (1), क्रांती चौक (1), जटवाडा रोड (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), चिकलठाना (1), जय भवानी नगर (3), एस.बी.आय झोनल ऑफिस (1), पी. ई.एस. कॉलेज (2), करमाड (2), टी.व्ही सेंटर (1), एन-2 सिडको (1), श्रेय नगर (2), उस्मानपुरा (1), विटखेडा (1), म्हाडा कॉलनी (2), अन्य (22)

ग्रामीण (06)लासूर स्टेशन, गंगापूर (1), अन्य (05)