वैजापूर बाजार समिती निवडणूक ; १९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल


वैजापूर ,२९ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी २८ एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज तिसऱ्या दिवशी सोळा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात पाच महिलांचा समावेश आहे. अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या आता १९ झाली आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तीन एप्रिलपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे. तिसऱ्या दिवशी अर्जांच्या संख्येत वाढ झाली असुन तीन महिलांसह सोळा जणांनी अर्ज भरले.

सेवा सहकारी संस्था 

अनिल आसाराम रोठे (राहेगव्हाण)

भाऊसाहेब कचरु त्रिभुवन (निमगाव)

राजेंद्र उत्तमराव चव्हाण (निमगाव)

प्रकाश सुभाषराव मतसागर (जरुळ)

संगिता राजेंद्र जाधव (शिऊर)

उषा पांडुरंग सुर्यवंशी (बळहेगाव)

अलकाबाई सिताराम वैद्य (लाख खंडाळा)

पुनमसिंग बंकटसिंग डोंगराळ (बेंदवाडी)

हिराबाई बाबुराव आव्हाळे (साकेगाव)

सुनिल कडु कारभार (चिंचडगाव)

आशाबाई नारायण भोपळे (भोकरगाव)

जगन्नाथ खंडेराव जाधव (शिऊर)

ग्रामपंचायत मतदारसंघ

गणेश पोपटराव इंगळे (लोणी)

काकासाहेब वसंत गोरे (दसकुली)

ज्ञानेश्वर देविदास ठुबे (पोखरी)

हमाल व तोलारी मतदारसंघ 

नितिन झुंबर निकम (अंचलगाव)