वैजापूर वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. बोरणारे यांनी केला सत्कार

वैजापूर,३१ मार्च /प्रतिनिधी :- वैजापूर जिल्हा वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरणकुमार त्रिभुवन व अन्य पदाधिकाऱ्यांचा आ.रमेश पाटील  बोरणारे यांनी मंगळवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार केला. विधी व न्याय विभागातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

वकील संघाचे  नवनिर्वाचित अध्यक्ष किरणकुमार ञिभुवन, उपाध्यक्ष व्ही.जी. वाघ, सचीव वैभव ढगे, कोषाध्यक्ष नितीन बोराडे यांचा तसेच वसंत क्लबच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संजय बत्तीसे यांचा आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी सर्वांचा सत्कार केला  व वकील संघाला विधी व न्याय विभागातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी जिल्हा सरकारी अभियोक्ता नानासाहेब जगताप, सचिन दहीभाते, संदीप डोंगरे, देवदत्त पवार, शरद हारदे, इमरान खान, प्रकाश ञिभुवन, बाळासाहेब भवर,अमोल भुसारे, पांडुरंग पवार व इतर सदस्य उपस्थित होते