वैजापूर पालिकेतर्फे शहरातील २०६ दिव्यांग व्यक्तींना ४ लाख १२ हजार रुपयांचा निधी व साहित्य वाटप

वैजापूर ,२९ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील २०६ दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यासाठी  शासनाकडून आलेला निधी तसेच नगरपालिकेचा निधी मिळून एकूण चार लक्ष १२ हजार रुपयांचा निधी व  ९० हजार रुपयांचे सहा दिव्यांग व्यक्तींना शिलाई मशीन, सायकल व पिको फॉल मशीनचे वाटप बुधवारी पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत), उपमुख्याधिकारी राहुल साठे व पालिका स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

सदरील रक्कम दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर बँकेत जमा करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींनी या निधींचा वापर योग्य प्रकारे करावा असे आवाहन मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत यांनी केले. या प्रसंगी संबंधित खात्याचे कर्मचारी सूनिल भाग्यवंत, दिवाकर त्रिभुवन, विनोद शिनगारे, अशोक गाडेकर, निर्मला जाधव व श्रीमती जेजुरकर आदी उपस्थित होते.