डॉ.हेडगेवार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा:सभासदांना 7 टक्के लाभांश

वैजापूर,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-येथील डॉ.‌हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना सात टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कंगले (नाना) यांनी पतसंस्थेच्या 33 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत रविवारी केली. स्टेशन रस्त्यावरील सुरज लॉन्स येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. सभेमध्ये विषय पत्रिकेप्रमाणे विविध ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र हे सध्याच्या तालुका क्षेत्रावरून वाढवून जिल्हा कार्यक्षेत्र करण्याचे ठरले.
सभेमधून सभासदांनी नऊ टक्के लाभांश देण्याची मागणी केली त्यानुसार सात टक्के लाभांश देण्याचे ठरले व उर्वरित दोन टक्के भेटवस्तू स्वरूपात देण्यासाठी निधीस वर्ग करण्याचे ठरले.सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच मौजे गोयगाव येथील पोलीस पाटील सूर्यकांत पाटील मोटे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव सभेमध्ये करण्यात आला. संस्थेचे सभासद तथा वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष आव्हाळे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी सभासदांना माहिती दिली. संचालक रावसाहेब मोटे, शिवाजी भांडे.
ॲड. के बी कदम, शैलेंद्र खैरमोडे, सागर पाटील इंगळे, राजाराम मोईन, प्रकाश बनकर, स्वानंद सोनवणे, भगवान व्यवहारे, महिला संचालिका अंजली कंगले, मंगल चव्हाण हे उपस्थित होते. सभेसाठी सुमंगल प्रतिनीधी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.