आनंद शंकर पंड्या यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली ,११ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत आनंद शंकर पंड्या जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आनंद शंकर पंड्या जी बहुप्रसव लेखक आणि विचारवंत होते.इतिहास,सार्वजनिक धोरण आणि आध्यात्मिक विषयांवर त्यांनी व्यापक लेखन केले. भारताच्या विकासाबाबत  त्यांना आस्था होती. विहिप मध्ये सक्रीय असणारे  पंड्या यांनी समाजाची निःस्वार्थ  सेवा केली. त्यांच्या निधनाने दुःख झाले.

आनंद शंकर पंड्या जी यांच्या समवेत मागच्या काळात केलेले संवाद मला स्मरतात.  थोर स्वातंत्र्य सैनिकांसमवेत त्यांनी साधलेला संवाद आणि विविध मुद्यांबाबत आशयघन विचार त्यांच्याकडून ऐकणे ही पर्वणी होती. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून शोक व्यक्त केला.ओम शांती ! असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.