वैजापूर शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; पाच महिलांसह तिघांना पकडले ; 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

वैजापूर ,​२०​ मार्च / प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी(ता.20) दुपारी छापा टाकून पाच महिलांसह तिघांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या खानगल्ली परिसरातील एका इमारतीत काही दिवसांपासून कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कुंटनखान्यावर छापा टाकला व वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह तिघांना पकडले.त्यांच्याकडून 1 लाख, 19 हजार 763 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे,श्रीराम काळे, मोईस बेग, पंकज गाभुड, ज्ञानेश्वर शिंदे,अजय गोलवाल,कुलदीप नरवडे,योगेश कदम, दिनेश गायकवाड, प्रशांत गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली.