वैजापूर पंचायत समितीमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांचे हयात प्रमाणपत्र स्वीकारण्यास टाळाटाळ

वैजापूर, ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सेवा निवृत्त शिक्षक/कर्मचारी यांनी आपण हयात असल्याचे प्रमाण पत्र पंचायत समिती, जिल्हा परिषद, बँक किंवा जेथून ते सेवानिवृत्त झाले तेथे दाखल करावे अन्यथा त्यांचे माहे नोव्हेंबर 2022 चे निवृत्ती वेतन मिळणार नाही असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. वैजापूर येथील ईतर सर्व कार्यालयात व बँकेत हयात प्रमाण पत्र स्वीकारत आहे किवा सेवानिवृत्त शिक्षकांची स्वाक्षरी घेत आहेत मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटून ही पंचायत समिती वैजापूर येथे हयात प्रमाणपत्र स्वीकारत नाही किंवा बुकलेट वर स्वाक्षरी घेत नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून हेलपाटे मारीत आहेत. विचारणा केल्यावर आठ दिवसानंतर बुकलेट येईल असे सांगण्यात येते.

वैजापूर तालुक्यात सेवानिवृत्त संख्या आठ हजारच्याआसपास आहे. आणखी आठ ते दहा दिवसांनी बुकलेट व मग हयात प्रमाण पत्र घेण्यात येतील तर खूप गर्दी होईल. दररोज या वृध्द व आजारी  निवृत्ती धारकांना खूप लांब यावे लागते. तालुक्याच्या ग्रामीण भागात सेवा निवृत्त शिक्षक मोठ्याप्रमाणात आहेत. काही तर वार्धक्यामुळेयेऊ शक्त नाही. पंचायत समिती वैजापूरला तात्काळ स्वाक्षरी बुकलेट पाठवून सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग व शिक्षकवृंद यांची होणारी ससेहोलपट थांबवावी अशी विनंती येथील तालुका  पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी जिल्हा कोषागार अधिकारी औरंगाबाद व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.