तिडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत व आरओ प्लान्टचे आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 12 लक्ष रुपये खर्चाच्या तिडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत व आरओ प्लांट चे लोकार्पण बुधवारी (ता.3) आ.बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.

आ.बोरणारे यांचे यावेळी भाषण झाले.गटातटाचे राजकारण न करता गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे व गावाचा विकास साधावा असे ते आपल्या भाषणात म्हणाले.

याप्रसंगी ह.भ.प.भागीनाथ महाराज,सरपंच सुदाम आहेर,संजय पवार,संजय पाटील कानडे, ग्रामसेवक श्री.पवार, पोलीस पाटील राजाभाऊ आहेर,भाऊसाहेब डुकरे, कडूभाऊ डुकरे, सावळाराम कोकाटे,शिवाजी तांबे,अशोक आहेर,जनार्दन डुकरे,योगेश केरे,वाल्मिक डुकरे,राजेंद्र जाधव,रामेश्वर कोकाटे,सचीन जगताप,भानुदास जगताप,रावसाहेब डुकरे,नानासाहेब डुकरे भानुदास डुकरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.