औरंगाबादची प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर स्टार ‘बिंदास काव्या’चा अखेर शोध:मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली

औरंगाबाद,१० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- युट्युवर लाखो फॉलोवर्स असलेली औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूब स्टार ‘बिंदास काव्या’चा अखेर शोध लागला आहे. ती मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली आहे. मागील चोवीस तासापासून ती बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ टाकल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.

याबाबत या मुलीच्या आईने एक १९ मिनिटाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा, असे आवाहन करण्यात आले होते . तसेच आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला होता.

.बिंदास काव्याचे खरे नाव काव्यश्री यादव आहे. तिचा जन्म 30 मार्च 2004 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिने लोकप्रियता मिळवली. काव्याचे Bindas Kavya नावाने यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनलवर तिचे व्लॉग अपलोड करत असते. नोव्हेंबर 2017 मध्ये हे चॅनल तिने सुरू केले होते.