विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश

औरंगाबाद,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पालकमंत्री निवड झाल्यानंतर संदिपान भुमरे यांनी  आज प्रथम येथे विविध विभागांची आढावा बैठक घेतली , विभाग प्रमुखांकडून विकास कामांची माहिती घेत जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही विभाग प्रमुखांना यावेळी दिले. तसेच आज विविध यंत्रणांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी शितल महाले तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

May be an image of 1 person and sitting

जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकास कामे, रस्त्यांची कामे, प्राथमिक शाळा इमारत बांधकाम, दलितवस्ती सुधार योजना, कोल्हापूर बंधाऱ्यासाठी तीन हजार गेटची आवश्यकता असून यासाठी पावणेचार कोटी रुपयांची आवश्यकता, स्मशान भुमीच्या शेडचे काम तसेच सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता, तालुकास्तरावर दिव्यांग भवन उभारणे, 63 केव्ही ची क्षमता वाढ करुन ती 100 केव्ही करणे, आवश्यकतेनुसार रोहित्राची उपलब्धता करण्यासाठी निधीची उपलब्ध करुन देणे, विभागीय क्रीडा  संकुलाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणे, घाटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी करणे अशा अनेक विभागांच्या कामांची माहिती यावेळी विभाग प्रमुखांनी या बैठकीत दिली.

May be an image of 9 people, people sitting and people standing