औरंगाबाद शहराचे सौंदर्यकरण टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-पालकमंत्री संदिपान भुमरे

पालकमंत्री यांनी केली जी २० परिषदेनिम्मित कामांची पाहणी

औरंगाबाद,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहे. यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संदिपान भुमरे यांनी आज  G-20 निमित्त झालेल्या सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे विविध कामांची पाहणी केली.

 सदरील पाहणी दौऱ्याची  सकाळी 10 वाजता विमानतळापासून  सुरुवात होऊन बीबी का मकबरा या ठिकाणी सांगता झाली.यावेळी पालकमंत्री महोदयांनी सुशोभीकरण साठी लावण्यात आलेल्या झाडे उन्हामुळे सुकून जाऊ नये याची काळजी घेण्याची सूचना दिली.

यावेळी त्यांच्या समवेत सहकार मंत्री श्री अतुल सावे,आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डये, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, तसेच एमएसइबी चे चीफ इंजिनियर, महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने,रवींद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चीफ इंजिनियर तसेच महापालिकेतील आणि एम एस ई बी व सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

मंत्री महोदयांनी सौंदर्यकरणाचे कामांचे कौतुक करून नागरिकांना आवाहन केले की त्यांनी  परिषद संपल्यानंतर ही शहराचे हे सौंदर्य टिकवून ठेवावे. G-20 परिषदेसाठी येणारे पाहुण्यांना नाथ सागर भेटीसाठी प्रशासनाने आग्रह करावा, यावेळी ते म्हणाले.

तसेच यावेळी प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी उपस्थित मनपा आधिकारी यांना सौंदर्यकरण व सुशोभीकरण कामे आज रात्री पर्यंत संपवण्याचे निर्देश दिले.तसेच बीबी का मकबरा मुख्य दरवाजाच्या डावीकडील बागेमध्ये सर्व ठिकाणी फुल झाडे लावण्याचे निर्देश दिले.