वैजापूरचे माजी आमदार अँड.उत्तमराव पटवारी यांचे निधन

वैजापूर ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूरचे माजी आमदार तथा जेष्ट विधीज्ञ अँड. उत्तमराव केशवराव भालेराव (पटवारी) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता.21 रात्री) पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

अँड.उत्तमराव पटवारी यांचे मूळ गाव खंडाळा होते. त्यांचे शिक्षण वैजापूर येथे झाले. समाजवादी विचार सरणीचे म्हणून ते ओळखले जात.1978 मध्ये जनता पक्षातर्फे नांगरधारी शेतकरी या चिन्हावर  त्यांनी वैजापूर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जेष्टनेते बाळासाहेब पवार (रेड्डी काँग्रेस) व इंदिरा काँग्रेसचे लक्ष्मणराव भिसे यांचा त्यांनी पराभव केला होता. स्वातंत्र्यसैनिक लाला बिंदाप्रसाद यांच्या बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतले होते. जेष्ट विधिज्ञ असलेले पटवारी यांनी विविध पदावर काम केले. मराठवाडा विकास परिषदचे सदस्य तथा वैजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. सध्या ते पुणे येथे मुलाकडे वास्तव्यास होते.