वैजापूर बाजार समिती निवडणुक पूर्वतयारीसाठी शिवसेना शिंदे गटाची बैठक

वैजापूर ,२६ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना शिंदे गटाची रविवारी (ता.26) येथे बैठक झाली. आमदार रमेश पाटील बोरणारे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

या बैठकीत वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडलेल्या सर्व सरपंच, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी आ. बोरणारे यांनी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. तसेच  बाजर समितीच्या संचालक मंडळाच्या निडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे देखील मत जाणून घेतले.

बैठकीस शिवसेना ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णूभाऊ जेजूरकर, राजेंद्र पाटील चव्हाण, कल्याण पाटील जगताप, नगरसेवक शेख रियाज, डॉ.निलेश भाटिया, सलीम वैजापुरी, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके, महेश बुणगे, सीताराम पाटील वैद्य, सुभान पटेल, शिवूर प्रमुख नंदू पाटील जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत कदम, जिल्हा समन्वयक अमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.