मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी,२६ मार्च  / प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.