वैजापूर येथील सुंदर गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त महापूजा

 माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्यावतीने भक्त – भाविकांसाठी महाप्रसाद

वैजापूर ,२४ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-अति पुरातन असलेल्या वैजापूर शहरातील सुंदर गणपती मंदिरात अंगरिका चतुर्थीनिमित्त मंगळवारी महापूजा व आरतीचा कार्यक्रम झाला.यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्यावतीने भक्त-भाविकांना महाप्रसाद देण्यात आले.

माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष साबेर खान, आमदार सौभाग्यवती संगीता बोरणारे, मर्चंट बँकेचे चेअरमन विशालसेठ संचेती,व्यापारी संघटनेचे प्रकाशसेठ बोथरा,सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत,नगरसेवक शैलेश चव्हाण, ज्ञानेश्वर टेके यांच्याहस्ते महापूजा झाली.

माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या वतीने भक्त-भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. मंदिर सभागृह बांधकामासाठी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या निधीतून 10 लक्ष रुपये देण्याचे यावेळी साबेरखान यांनी जाहीर केले.या महापूजा व आरतीस काशीनाथ आगाज, संतोष बोथरा,बेबीताई चौधरी,श्रावण चौधरी,गणेश धुमाळ,श्याम पवार,बाळू पुणे,सुरेश वडनेरे,राजू पुणे  यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.