विद्यार्थ्यांने भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2 मार्च पासून सुरू होत आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय  यांनी दिले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडावी यादृष्टिने पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, शिक्षणाधिकारी श्री देखमुख, पोलिस उपायुक्त अपर्णा गित्ते आदी उपस्थित होते.

          कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सर्व संबंधीत परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सीसीटीव्ही सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या-त्या परीक्षा केंद्रावर व्हायला हवा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या-त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय  यांनी सांगितले.

महत्वाचे मुद्दे

1.      औरंगाबाद जिल्ह्यात इ. 12 वी साठी एकूण 157 परीक्षा केंद्रावर 60,425 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत.

2.     इ.10 वी साठी एकूण 227 परीक्षा केंद्रावर 64,919 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत.

2.सदर परीक्षेच्या पूर्व तयारी म्हणून शाळा स्तरावर पालकांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच आज दुपारी संत एकनाथ रंगमंदिर येथे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र असलेल्या शाळांचे संस्थांचे प्रमुख/ प्रतिनिधी व केंद्रावरील केंद्र संचालक यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.

3. पोलीस बंदोबस्त :-

     1. परीक्षा केंद्राच्या 50 मिटरच्या आत अनाधिकृत व्यक्तिांना प्रवेश नाही.

     2. परीक्षा केंद्रावर कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आलेल आहेत.

     3. 100 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेण्यात येणार आहे.

     4. पोलीस पाटील, कोतवाल व शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी व अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेंच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करण्यात येणार आहे.

बैठी पथके :-

1.      सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा आधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तर पत्रिका ताब्यात घेई पर्यंत) उपस्थित राहतील.

5.भरारी पथके :-

      1. शिक्षण विभागाची 06 भरारी पथके परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहेत.

           2. महसुल विभागाची 10 पथके परीक्षा केंद्रावर भेटी देण्यासाठी स्थापन केलेली आहे.

           3. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका निहाय संपर्क अधिकारी म्हणून खाते प्रमुखांच्या नेमणुका केलेल्या आहेत.

           4. परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2023

1)     12 वी परीक्षा- कालावधी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च

परीक्षा केंद्रांची संख्या -157

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी संख्या -60425

परीक्षकांची संख्या -21

2)    10 वी परीक्षा कालावधी 2 मार्च ते 25 मार्च

परीक्षा केंद्राची संख्या -227

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी संख्या -64919

परीक्षकांची संख्या -21