वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट वाढला ; आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांची “फिल्डिंग”

जफर ए.खान

वैजापूर ,३ जून :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वैजापूर तालुक्यात एक गट वाढला असून गटांची संख्या 9 झाली आहे तर गणांची संख्या 18 झाली आहे.
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व त्यात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे व ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गावे,वस्त्या, तांडे) अशी –

1) वाकला – पोखरी, वाघला, भटाणा, साकेगांव, हिंगणे कन्नड, मनेगांव, जिरी, बळेगांव, पिंपळगांव खंडाळा, सावखेड खंडाळा, वाकला, तलवाडा, बाभूळतेल, लोणी खुर्द, नायगव्हाण, कविटखेडा, अंचलगांव 
2)धोंदलगांव – धोंदलगांव, नालेगांव, भायगांवगंगा, लाखणी, मांडकी, राहेगांव, सोनवाडी, राजुरा, उंदिरवाडी, अमानतपूरवाडी, बाभूळगाव बुद्रुक, बाभूळगाव खुर्द, गारज, भोकरगांव, बायगांव, मणूर, मालेगांव कन्नड, बाभुळखेडा, झोलेगांव, शिवगांव
3) शिऊर – शिऊर, पेंडेफळ, सफियाबादवाडी, हाजीपुरवाडी, पारळा, भादली, चिकटगांव, खरज, निमगाव, हिलालपूर, आलापूरवाडी, टुणकी, बोरसर, भिंगी 
4) खंडाळा – कोल्ही, सुदामवाडी, रघुनाथपुरवाडी, संजरपूरवाडी, भिवगांव, खंडाळा, जानेफळ 
5) सवंदगांव – बिलोणी, नारळा, वडजी, लाखखंडाळा, पानवी खुर्द, पानवी खंडाळा, चांडगांव, नांदगांव, रोटेगांव, बेलगांव, सवंदगांव, पानगव्हाण, लोणी बुद्रुक, जरुळ, भायगांव वैजापूर, आघूर
6) लासुरगांव – पालखेड, गोलवाडी, बल्लाळीसागज, एकोडीसागज, शिवराई, बेंदवाडी, परसोडा, लासुरगांव, पाशापूर, हडसपिंपळगांव, करंजगांव, दहेगांव, शाहजतपूर, लखमापूरवाडी, जळगांव, खिर्डी
7) लाडगांव – घायगाव, वैजापूर ग्रामीण-1, तिडी, जांबरगाव, आगरसायगाव, चिंचडगाव, कनकसागज, टाकळीसागज, माळीसागज, लाडगाव, फकिराबादवाडी, नगिनापिंपळगाव, खंबाळा, वैजापूर ग्रामीण -2,  भगगांव, डवाळा, सुराळा, भऊर
8) चोरवाघलगांव – वांजरगाव, बाभूळगावगंगा, नांदूरढोक, पुरणगाव, लाखगंगा, बाबतरा, डोणगाव, हिंगोणी, कंगोणी, गोयगाव, सावखेडगंगा, भालगाव, चोरवाघलगाव, हनुमंतगाव, सटाणा, म्हस्की, विरगाव, कापुसवाडगाव, नादी, डाकपिंपळगांव
9) महालगाव – महालगाव, भगूर, सिरजगाव, पानवी बुद्रुक, माळीघोगरगांव, नागमठाण, चेंडूफळ, देवगाव शनी, बाजाठाण, अव्वलगाव, चांदेगाव, टेंभी, जातेगाव, गाढेपिंपळगाव 
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पावसाळ्यानंतर होणार असल्या तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आजी – माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्याचे सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती, अविनाश पाटील गलांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, विद्यमान सदस्य पंकज पाटील ठोंबरे, दीपक राजपूत, माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, स्व.रामकृष्णबाबा पाटील यांचे चिरंजीव काकासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचे चिरंजीव अजय पाटील चिकटगांवकर ही मातब्बर मंडळी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे .जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक चांगलीच गाजणार यात शंका नाही.