मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक

वैजापूर ,३ जून  /प्रतिनिधी :-शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे_यांच्या 8 जून रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या विराट जाहीर सभेच्या पुर्वतयारीसाठी गुरुवारी वैजापूर – गंगापुर विधानसभा मतदार संघाच्यावतीने येथील शिवसेना कार्यालयात राज्याचे रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार रमेश पाटील बोरणारे, आमदार उदयसिंग राजपूत,माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आढावा बैठक झाली.


सभेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित या बैठकीत संदीपान भुमरे, आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे आदींनी मार्गदर्शन केले. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणारी जाहीर सभा ही ऐतिहासिक होणार असून या सभेसाठी मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, संतोष काळवणे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  संचालक रामहरीबापू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य  मनाजी पाटील मिसाळ,  सुभाष पाटील कानडे, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, अंकुश पाटील सुंब, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकप्रमुख  महेश पाटील बुणगे, पालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश चव्हाण, उपजिल्हासंघटक  सुलभाताई भोपळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे, तालुकासंघटक वर्षाताई जाधव, शहरसंघटक पद्माताई साळुंके, युवासेना जिल्हासमन्वय अमिर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, बळीराम राजपूत, खलिल मिस्तरी, बाळासाहेब पाटील जाधव यांच्यासह शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक, महिला आघाडी, शिवसेना-युवासेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.