जिज्ञासा चित्रकला प्रदर्शनाला सुरुवात

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  जैन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडा च्या वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे कॅनवास पेंटिंग चे चित्र प्रदर्शन कला दीर्घ आर्ट गॅलरी येथे सुरू झाले आहे. या चित्रपटदर्शनाचे उद्घाटन एमजीएम संस्था चे विश्वस्त आणि विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीत जैन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक जितेंद्र छाजेड, अभिजीत छाजेड यांच्या हस्ते झाले.

जिज्ञासा या शीर्षकाखाली मुलांनी टिकून 120 कॅनव्हास पेंटिंग बनवल्या आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून माळीवाडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांना एक लाख रुपयाची शैक्षणिक मदत मुलांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे प्रदर्शन 18,19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत चालू राहणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी प्राचार्य प्रशांता कुमार , शिक्षक गण तसेच अनेक पालक वर्ग यांची उपस्थिती होती.

जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन जिसा शाळेचे संस्थाचालक तसेच प्राचार्य, शिक्षक गण यांनी केले आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रोहित गिरी तसेच प्रज्ञा साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.