औंरगाबाद जिल्ह्यात 1029 कोरोनामुक्त, 442 रुग्णांवर उपचार सुरू

औंरगाबाद, दि.31 :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 442 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1543 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

          आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1),  गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1),  नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1), किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1),  नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1),  जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1),  अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1),  चंपा चौक (1), शताब्दी नगर (1),  अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 19 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *