तरुणीवर बळजबरी बलात्कार करणारा आरोपी शेख हबीब शेख महेबुब याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद ,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :-लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवर बलात्‍कार केल्‍यानंतर आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्‍यानंतरही मोबाइल मध्‍ये घेतलेले फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी देत तरुणीवर बळजबरी बलात्कार करणारा आरोपी शेख हबीब शेख महेबुब (३१, रा. जनता कॉलेज जवळ ता. जि. जालना) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. भिष्‍मा यांनी फेटाळला.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी आरोपीला जिल्हा व सत्र न्‍यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, मात्र आरोपीने अटकपूर्व जामीनींच्‍या अटींचे उल्लंघन केल्याने फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीच्‍या अनुषंगाने न्‍यायालयाने तो जामीन रद्द केला होता.

या  प्रकरणात २७ वर्षीय पीडित तरुणीने दिली आहे. त्‍यानूसार, सन २०१७-१८ मध्‍ये पीडिता ही एका रुग्णालयात काम करित असतांना तिची ओळख मित्रा मार्फत आरोपी हबीब शेख याच्‍याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले, त्‍यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्‍यावर सिडको बस स्‍थानकाजवळील एका लॉजवर बळजबरी बलात्‍कार केला. तेंव्‍हा आरोपीने तिचे संबंध घेतानाचे फोटो काढले. त्‍यानंतर हबीबने औरंबादेतील विविध लॉजवर पीडितेच्‍या घरी नेत फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी देत तिच्‍यावर वांरवर बलात्‍कार केला. पीडिता लग्नाबाबत आरोपीकडे विचारणा करित तेंव्‍हा आरोपीला तिला उडवा-उडवीची उत्तरे देत होता. जून २०२० मध्‍ये आरोपीने दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याची माहिती पीडितेला मिळाली.

२० ऑगस्‍ट २०२० मध्‍ये पीडिता ही नवी मुंबईत राहण्‍यासाठी गेली. तेव्‍हा देखील आरोपीने फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी देत पीडितेवर नेरुळ येथील एमटीडीसीच्‍या लॉजवर नेत बळजबरी बलात्‍कार केला. पीडितेने लग्न ठरल्याची बाब आरोपीला सांगितली असता त्‍याने लग्न करु नको आणि केले तरी पूर्वी प्रमाणे माझ्याशी संबंध ठेवावे लागतील अशी धमकी दिली. १३ मे २०२१ रोजी आरोपी हा पीडितेला भेटण्‍यासाठी वाशी येथे आला व त्‍याने पीडितेचा मोबाइल बळजबरी हिसकावून घेतला व धमकी दिली. प्रकरणात वाशी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होऊन तो मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात वर्ग करण्‍यात आला.

आरोपीने गुन्‍ह्यात अटक होऊ नये यासाठी २०२१ मध्‍ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, त्‍यावेळी न्‍यायालयाने त्‍याला अटी व शर्तींसह जामीन मंजुर केला होता. मात्र त्‍यानंतरही आरोपीने पीडितेला मुंबई येथे जावून धमकी दिली. त्‍यानंतर पीडितेने याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. आरोपीने अटी व शर्तींचा भंग केला म्हणुन आरोपीचा जामीन रद्द करण्‍यात आला. त्‍यानंतर आरोपीने पुन्‍हा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला. या  प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले.