महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता मोहीमचे सोयगाव बस आगारात उद्घाटन

सोयगाव ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता मोहीम दि.११ ते २५ पर्यंत अभियान राबविण्यात येत आहे.त्याचे उद्घाटन बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता सोयगाव बस आगारात करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदार व सोयगाव पेंशनर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष आबासाहेब बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आगाराचे वाहतूक निरीक्षक गोपाल पगारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आगार प्रमुख  हिरालाल ठाकरे यांनी भूषविले.सदर कार्यक्रम प्रसंगी सपोनि अनमोल केदार यांनी अपघात सुरक्षेवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.त्यात आवर्जून त्यांनी आता पर्यंत केलेल्या एस.टी.बस प्रवासाचा उल्लेख केला.यावेळी आबा बाविस्कर,भास्कर पिंगाळकर, पोलिस कर्मचारी रवींद्र तायडे,नारायण खोडे,योगेश बोखारे,विशाल घन,विष्णू गव्हाणे यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय मार्गदर्शन भाषण सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन कैलास बागुल,राहुल नागरगोजे व गणेश कोरडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख कारागिर रमेश साबळे,वाहतूक नियंत्रक अशोक काळे,वर्जान जाधव, ज्ञानेश्वर वाडेकर,सुरेश हळनोर,विनोद जाधव,तसेच चालक, वाहक,व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते