आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

औरंगाबाद, ३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-पश्चिम विधानसभा मतदार संघातील जवाहर कॉलनी अंतर्गत भानुदास नगर व सातारा-देवळाई परिसरात असलेल्या संग्रामनगर, ओबेरॉयनगर, आनंदनगर या भागामध्ये भूमिगत गटार व सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

सातारा-देवळाईसह इतर भागातील नागरिक, महिला माझ्याकडे दररोज निवेदन घेऊन येतात की, आमच्या गल्लीमध्ये, सोसायटी मध्ये रस्ते, ड्रेनेज लाईनचे कामे करण्यात यावी म्हणून मला भेटत असतात, माझ्याकडे आलेला प्रत्येक नागरिक हा कधीच नाराज होऊन जातं नाही, मला जे जे निवेदन प्राप्त झाले आहे त्या प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते, ड्रेनेज लाईनच काम झाले आहे, आज सातारा-देवळाई मध्ये मोठ्या संख्येने विकास कामे सुरू   आहेत, प्रत्येकाला ये-जा करण्यासाठी रस्ता पाहिजे असतो, तो प्रत्येकाला उपलब्ध करून देतच आहे, पण त्याच बरोबर तुमच्या चेहऱ्यावर असलेले समाधान पाहून आनंद देखील होते, तुम्ही निवडून दिले आहे तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.

याभूमीपूजन प्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, बापू पवार, विभागप्रमुख रणजित ढेपे, नंदू लबडे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, माणिक जोहरले, गोरख सोनवणे, अनिल थोटे,सुशील कुलकर्णी, महिला आघाडी शहर संघटक आशा दातार, उपशहर संघटक सुचिता आंबेकर, विभाग संघटक रंजना आहेर, शाखा संघटक संध्या मोगल, आप्पा काळके, राम गिलडा, सतीश महानोर, रवी ढगे, प्रशांत कपिले, गजानन पाटील, प्रशांत गायकवाड, रोहिदास मोरे, बाळू मोहिते, संजय भुजबळ, पंकज शिंदे, दीपक शिंदे, योगेश पाटील, संतोष देशमुख, संतोष मुळे, गणेश पवार, राजेंद्रसिंग, कुणाल त्रिभुवन, राजू मंडलिक, शंकर म्हात्रे, मुकुंद विभूते, रमेश गेनदे, राहुल थोरात, गणेश मोगल, सोमनाथ देवकाते, महीमुद खान, गणेश तुपकर, विनायक जाधव, प्रमोद सदाशिवे, अनुप अग्रवाल, रिवान पाटील, विष्णू वजरे, विठ्ठल सुरासे, प्रवीण भारुटे, तुषार भोळे, अनिल चव्हाण, नानुसिंग चव्हाण, राजेश आडगुळे, प्रवीण सार्कवाल, लक्ष्मण कोडमवार, विनय जोशी, मनीष मेंडके, राधाकिसन राठोड, मजुरादास देशमुख, मचिंद्र तांबे, दिलीप खाडे, सतीश काळूसे, संध्या नलावडे, मंगल ताठे, संध्या नलावडे, अर्चना राऊत, अर्चना काथार, मंगल डोंगरे, सुभद्रा पवार, सुमित्रा वळेकर, उषा कावरे, सुनीता गोरे, नर्मदा काथार, कलावती पाटील, सरला खैरनार, मंगल हरे आदींच्या संख्येने शिवसेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.