वैजापुरात शिंदे-भाजप व ठाकरे गटासह महाविकास आघाडीचा विजयाचा दावा

लक्षवेधी ठरलेल्या महालगाव ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचे अविनाश गलांडे यांचा पॅनल विजयी 

वैजापूर,२० डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या सरपंच व 169 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.18) झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 टेबलावर करण्यात येऊन सर्व निकाल दुपारी जाहीर करण्यात आले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अकरा ठिकाणी सरपंच व 93 सदस्य निवडून आल्याचे तालुकाप्रमुख कल्याण दांगोडे यांनी सांगितले तर अकरा जागांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांनी केला आहे. शिंदे गटाने सरपंचपदाच्या 13 जागा जिंकल्याचा दावा केला आहे तर अठरा जागेवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंकज ठोंबरे यांनी दिली. 

वांजरगाव ग्रामपंचायत:  सलीम नसीर पठाण (सरपंच),  यास्मिन शफिक सय्यद, गंगुबाई कोळेकर, राहुल त्रिभुवन, अजहर सय्यद( बिनविरोध), रेखा त्रिभुवन, विष्णु लहीरे, अलका चौधरी हे सदस्यपदी निवडुन आले. हाजी अकिल शेख, नगरसेवक रियाज शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी विजयी उमेदवारांचा‌ सत्कार केला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, कल्याण दांगोडे, कैलास पवार यांनी संपर्क कार्यालयात सत्कार केला. महालगाव येथे शिवसेनेचे (ठाकरे गट) यांनी गड राखला.

काही ग्रामपंचायतींचे सरपंच व विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:
तिडी: रंजना आहेर (सरपंच)
कांबळे, दीपक कांबळे, उषा काकडे, तारा तांबे,
शेख एजाज नवाज, सुनीता मिसाळ, संगिता डुकरे, राजू जाधव, कडूबाई गवळी,  सुमनबाई आहेर (सदस्य) पारळा: कल्पना आहेर (सरपंच)
विशाल शेळके, अलकाबाई ठाकरे
अर्चना आहेर, ज्ञानेश्वर मोरे, ऋषिकेश आहेर, वत्सलाबाई आहेर,  गोरख आहेर, सुवर्ण घुगे, पूजा जगताप (सदस्य)
रोटेगांव: अनिता शिंदे (सरपंच), लक्ष्मण थोरात, उज्ज्वला थोरात, संध्या शिंदे, संताराम शिंदे
मीना खुरसने,आशा शिंदे, पवन थोरात,  धीराजकुमार राजपूत (सदस्य), नांदुरढोक: रेखा बोरगे (सरपंच)  गयाबाई वराडे,  योगेश घंगाळे, जयश्री निकम, संदीप गाढे, शांता गायकवाड, ज्योती फणसे
नारायण घोडे, उदयकुमार कुणजीर, रंजना हिरडे (सदस्य)


पुरणगाव: कमल ठोंबरे (सरपंच), शांता ठोंबरे, दत्तात्रय ठोंबरे, हिराबाई कसबे, सुरेश ठोंबरे, संगिता ठोंबरे, भिकाजी ठोंबरे, रंजना लोखंडे (सदस्य)
महालगाव: रोहिणी काळे (सरपंच), गणेश आहेर, कल्याण झिंझुर्डे, लताबाई हुमे, सुरेश आल्हाट, सुधाम गलांडे, सत्यभामा मतकर, शितल आल्हाट, लिलाबाई आल्हाट, मधुकर शेळके, सोनम आल्हाट, रुपाली जाधव (सदस्य) कोल्ही: उषाबाई म्हस्के (सरपंच), दादासाहेब मगर, सिंधुबाई गोरे, कविता डगळे, बिजाबाई त्रिभुवन, राज पवार, हिराबाई डगळे, रोहिदास मगर, कमलबाई पवार, शकुंतला कदम (सदस्य)