रस्ता दुरुस्तीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी “समृध्दी” चे काम बंद पाडले ; कामगारांवर हल्ला

वैजापूर ,१२ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गावरील कामामुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने शनिवारी सायंकाळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे व मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृध्दी महामार्गावरील काम करणाऱ्या कामगारांवर हल्ला करून एल अँड टी कंपनीचे काम बंद पाडले.

लाडगाव रस्त्यावर रस्ता उकरून खराब केल्याने मनसे कार्यकर्त्यानी समृध्दीवर महामार्गावर धिंगाणा घालीत एल & टी कंपणीचे सुरू असलेले हे काम बंद पाडून तालुक्यातील 164 किलोमीटर रस्त्याचे अपुर्ण असलेले दुरूस्तीचे काम पुर्ण करून द्यावे अन्यथा कंपनीचे काम बंद पाडून एकही काम होऊन देणार नसल्याचा इशारा दिला.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांनी एल & टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना  बजावले व काम बंद पाडले.