डागपिंपळगाव नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर,१४ मार्च  /प्रतिनिधी :-सार्वजनिक बांधकाम विभाग नाबार्ड योजनेअंतर्गत डागपिंपळगाव नदीवरील पुलाच्या बांधकामांसाठी 1 कोटी 92 लक्ष रुपये निधी मंजूर झालेल्या या कामाचा शुभारंभ रविवारी श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती  महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,  शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान , महंत रामगिरी महाराज यांची समयोचित भाषणे झाली. वैजापूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ.बोरणारे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमास मधुकर महाराज, स्वातंत्रसैनिक लक्ष्मण पाटील उघडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.काकड , कनिष्ठ अभियंता राठोड मॅडम, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, कल्याण पाटील  जगताप, सिताराम पाटील भराडे, महेश पाटील बुनगे, विभागप्रमुख नानासाहेब थोरात, भिमाशंकर तांबे, शासकीय गुत्तेदार डावखर दादा, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, जिल्हासमन्वयक अमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उपशहरप्रमुख कपिल खैरे, समीर लोढे, नारायण विखे, उपविभागप्रमुख बंडू पाटील गायकवाड, सुनिल कारभार  उपतालुकाप्रमुख प्रसाद पवार, सरपंच किरण पाटील तांबे, विनोद पाटील कदम, रामभाऊ बारसे, अशोक गागरे, लक्ष्मण  काळे, दिपक बोरनारे, गणेश निकोले, आप्पासाहेब पवार, बाळासाहेब कदम, किरण कदम, प्रदिप वाढेकर, दत्तु पाटील रोठे, अक्षय कर्डक यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.