वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ‘भक्ती की लहर’ या उपक्रमाची सुरुवात

वैजापूर,२० डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने भक्ती कि लहर या उपक्रमाची सुरवात रविवारी करण्यात आली.

    या उपक्रमात निर्मला इन्स्टिटय़ूट मधील विद्यार्थ्यांना योगा व प्राणायमचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात 45 विद्यार्थिनींनीही लाभ घेतला..शेवटी अन्नदानाचा कार्यक्रम  झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिक्षिका वर्षा दिदी..याच्या मार्गदर्शनाखाली.मनिषा लालसरे, हरिभाऊ साबणे, रेणुका कुलकर्णी, चैताली साबणे, सुनिल गायकवाङ, साक्षी टेके, वसुंधरा तांबे, वैशाली साखरे, राहुलजी व सुशीलाजी यांनी सहकार्य केले.