वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

वैजापूर, १२ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रद्धा हॉस्पिटल लोणी वैजापूर तालुका येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.अर्जुन साळुंके (कविटखेडकर) यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिबिराचे उदघाटन व मार्गदर्शन केले.या शिबिरात डॉ.गणेश अग्रवाल,  देवगिरी हॉस्पिटल वैजापूर, डॉ.तुषार साळुंके पोटाचे विकार तज्ञ, अनिरुद्ध हॉस्पिटल येवला, डॉ.गव्हाणे डोळ्याचे तज्ञ येवला,डॉ.मयूर लांडे दंतरोग तज्ञ शिऊर बंगला, तसेच लोकमान्य ब्लड बँक औरंगाबाद यांनी सेवा दिली. जवळपास 200 ते 250 रुग्ण तपासण्यात आले  तर 25 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य पी.आर. जाधव, दत्तुभाऊ जाधव, युवा नेते अजय पाटील चिकटगावकर, बाजार समिती उपसभापती रिखब पाटणी, पंचायत समिती समितीचे माजी उपसभापती राजूनाना मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष उत्तमराव निकम ,भाऊसाहेब पाटील निमगावकर, गोटू नाना जाधव, जगनाथ पाटील साळुंके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, दिलीप निकम, संतोष जाधव, विभागप्रमुख भिकन सोमासे, आनंद निकम, पद्माकर निकम, डॉ.शरद साळुंके, डॉ. नयन मोरे, डॉ. सुरेश दारवंटे, डॉ.तुषार घाडगे, आर. के. निकम, गणेश निकम, प्रकाश जाधव ,किशोर मगर, किशोर जाधव, गोटू नाना जाधव, व्हॉईस चेअरमन सोमनाथ तांबे, आत्माराम शिंदे ,नितीन साळुंके, सजन चोभे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.उत्तमराव निकम, रिखब पाटणी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.