जर तुम्हाला वाटले…तर तुम्हीही सांगा”; सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना महाविकास आघाडी आणि भाजापा-शिंदे गटाकडून एकमेकांना जोरदार टोलेबाजी केली.

अजित पवारांनीही मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही अजित पवारांना प्रतिउत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते की अडीच वर्ष झालीत, आता मला मुख्यमंत्री बनायचे आहे. तरी उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला तिथे बसवले असते”. असा टोला लगावला होता. त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनीही प्रतिउत्तर दिले आहे. “अजित दादा जर तुम्हाला वाटले मुख्यमंत्री व्हावे तर मी सांगतोय आमच्या कानात येऊन सांगा”, असा खोचक टोला मुनगंटीवारांनी लगावला आहे.