वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयास ‘नॅक’ चमुची भेट

वैजापूर, १२ डिसेंबर / प्रतिनिधी :-केंद्र सरकार पुरस्कृत  उच्च शिक्षण देणाऱ्या  संस्थांच्या भौतिक आणि गुणात्मक दर्जाची शहानिशा करून महाविद्यालयाची मुल्यांकन पत ठरविणारी   राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद ‘ नॅक’ ही बंगलोर  स्थित असून भारतातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणारी ही  संस्था असून या संस्थेच्या तीन सदस्यीय चमुने  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात ता.८व ९ डिसेंबर दरम्यान   महाविद्यालयास भेट दिली.

या चमुत डॉ अजयकुमार पी.पी.(केरळ), यांच्या नेतृत्वाखाली प्रो. डॉ विनोद पटेल (गुजरात), डॉ.टि.सी. लोया( राजस्थान) याचा समावेश होता. दोन दिवसीय भेटी दरम्यान या  चमुने  महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा व  विविध विभागातील शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला तसेच संस्थाचालक, महाविद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कार्यालयीन कर्मचारी याच्याशी हितगुज केले व महाविद्यालयाच्या पाच वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल ‘ नॅक’ कडे सोपविण्यात आला यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समिती प्रमुख कृषीभूषण अप्पासाहेब पाटील, डॉ.निलेश भाटिया, देवदत्त पवार, काशिनाथ गायकवाड,दिलीप बोरणारे, रावसाहेब जगताप, श्रीमती आनंदीबाई अन्नदाते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य तथा आयक्युएसी समन्वयक, डॉ दादासाहेब साळुंके, उपप्राचार्य डॉ संदीप परदेशी, रजिस्ट्रार विजय आहेर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती