जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वैजापुरात फेरी

वैजापूर, ४ डिसेंबर  / प्रतिनिधी :- “दिव्यांग व्यक्ती कुणाची–तुमची आमची सर्वांची,” मिळू न सारे ग्वाही देऊ – दिव्यांगांना सक्षम बनवू, “दिव्यांगांचा मान-देशाचा अभिमान “अशा घोषणा देत येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता.03) दिव्यांग जागृती फेरी काढून समाजातील नागरिकांना दिव्यांग विषयी सहानुभूती दाखविण्याचे आवाहन केले. 

शहराच्या विविध भागातून जाणाऱ्या या फेरीला माजी शिक्षणाधिकारी व स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत,गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, बाबासाहेब जगताप शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी झेंडा दाखविला. समग्र शिक्षण जिल्हा परिषद औरंगाबाद समावेशीत शिक्षण गट साधन केंद्र, शिक्षण विभाग पंचायत समिती बैजापूर व मौलाना आझाद विद्यालय नगरपरिषद वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनी ही जाणीव जागृती फेरी काढण्यात आली. या समयी मुख्याध्यापक जी.जी. राजपुत, बी. बी. जाधव, एम.आर. गणवीर, संदीप शेळके, नीता पाटील, सुवर्णा बोर्डे, लता सुखासे, राजश्री बंड, सुनीता वसावे, श्री. रावकर यांनी फेरीचे आयोजन केले होते. शेवटी  आयोजक बाबासाहेब जगताप यांनी आभार मानले.