वैजापूर तालुक्यात महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास मुरूम उपसा

वैजापूर, ४ डिसेंबर  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैधरित्या उपसा सुरू असून या उपशास महसूल अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याने सरकारला मात्र कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारा गौण खनिज विभाग मात्र या अवैध वाळू उपशावर जाणीवपूर्वक ‘अर्थपूर्ण’ डोळे झाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

गौण खनिज विभागामार्फत मुरूमाच्या राॅयल्टी द्वारे विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र अवैध मुरूम उपसा केल्याने सरकारला फटका बसतो. बांधकामांचे प्रमाण वाढल्याने अवैध मुरूम उत्खननाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. स्थानिक महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास मुरुम उपसा सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.मात्र अधिकारी व कर्मचारी तक्रारी कडे दुर्लक्ष करतात.   तालुक्यातील बिलोणी  येथे गायरान जमीनीतून  अवैध गौण खनिज मुरूमाचे  उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे.येथून एकाने लाखो ब्रास मुरुम उपसा केला आहे.या प्रकरणी महसुली विभागाने दुर्लक्ष केले आहे.याचाच अर्थ महसूल विभागाचे अधिकारी मूरूम उपशास अभय देत आहे.असे दिसून येत आहे.

——————————-

महसूल विभाग मुरुम माफीयांना पाठीशी घालतात.तक्रारी होवून सुद्धा तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.

ॲड. एकनाथ कुंजीर

——————————–

विशेष म्हणजे सूर्यास्त नंतरही अवैध गौण खनिज वाहतूक या परिसरातून लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन केले जात आहे. . विशेष म्हणजे अनेक वाहनातून दिवसा मुरमाची वाहतूक केली जात आहे. मुरूम माफियांची तालुक्यात मोठी साखळी निर्माण झाली आहे. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून अवैध गौण खनिज उत्खननाचा धंदा सुरू आहे. या प्रकारामुळे वैजापूर तालुक्यातील गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाचे सर्व नियम व कायदे मोडले जात आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

————————————–

बिलोणी मुरुम उपशा बद्दल माहिती नाही.परंतू तेथे पथक पाठवून चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

तहसिलदार राहुल गायकवाड

———————————–

दरम्यान, एकीकडे प्रशासन महसूल वाढावा म्हणून कडक कारवाई करीत असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्या मागार्ने अवैध उत्खनन करून प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. तालुक्यातील नांदुर ढोक, बाभुळगाव गंगा  शिवारातून बेकायदेशीर रित्या पुरग्रस्तासाठी संपादीत जमीन,पाझर तलाव व गायरान जमीनीतून मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उपसा झाला आहे. याची ईटीएस मशीन द्वारे गुरूवार पासून मोजणी सुरू झाली आहे.