वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली ; नारंगी व मन्याड वगळता अन्य प्रकल्प कोरडे

वैजापूर,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत   मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस या महसूल मंडळात झाला आहे. जोरदार पावसामुळे मन्याड साठवण तलाव 100 टक्के भरले आहे तर शहरालगतच्या नारंगी धरणात 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, अन्य प्रकल्पात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 500.02 मि.मी.आहे. ही वार्षिक सरासरी पावसाने ओलांडली असून 16 सप्टेंबरपर्यंत 515.09 मिलीमीटर पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मन्याड साठवण तलाव 100 टक्के भरले आहे तर शहरालगतच्या नारंगी धरणात 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नाशिक जिल्हयातील पालखेड धरणाचे अतिरिक्त पाणी नारंगी धरणात डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येत असून या पाण्याची आवक सुरू आहे. बोर दहेगांव मध्यम प्रकल्पात 22.92 टक्के,  कोल्ही मध्यम प्रकल्पात 20.54 टक्के, सटाणा लघु प्रकल्प 11.07 टक्के, गाढेपिंपळगांव लघु प्रकल्प 20.06 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून बिलवणी लघु प्रकल्प, खंडाळा लघु प्रकल्प व जरुळ लघु प्रकल्प हे तीन प्रकल्प मात्र कोरडे आहेत. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे तालुक्यातील 43 गावांतील शेती पिकांना फटका बसला आहे.
तालुक्यातील दहा महसूल मंडळात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे -वैजापूर 568 मि.मी., लाडगांव 693 मि.मी,महालगांव 646 मि.मी., नागमठाण (615 मि.मी.,लासुरगांव – 480 मि.मी., खंडाळा -440 मि.मी., बोरसर – 456 मि.मी., लोणी खुर्द – 410 मि.मी.,गारज – 389 मि.मी., शिऊर – 462 मि.मी.तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा 
नारंगी मध्यम प्रकल्प (70.27  टक्के),बोर दहेगांव मध्यम प्रकल्प (22.92  टक्के) कोल्ही मध्यम प्रकल्प (27.49  टक्के)  मन्याड साठवण तलाव (100  टक्के) बिलोणी लघु प्रकल्प (Bellow sill) खंडाळा लघु प्रकल्प  (Bellow sill) सटाणा लघु प्रकल्प  (11.07 टक्के) गाढेपिंपळगांव लघु प्रकल्प (27.13 टक्के)  जरुळ लघु प्रकल्प (Bellow sill)         –