नौगाजीबाबा दर्गा परिसरातील निराधार व दुबळ्या महिलांना दिवाळी भेट ; साडी -चोळीचे वाटप

वैजापूर,२५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील नारंगी -सारंगी नदीच्याकाठी असलेल्या नौगाजी बाबा दर्गा परिसरात शेकडो निराधार, दीन, दुबळे पुरुष व महिला बाबांच्या आश्रयाला असतात याची जाण ठेवत सी.आर.पी.एफचे सेवानिवृत्त जवान व माजी सैनिकबलाचे अध्यक्ष गौतम गायकवाड, त्यांच्या मातोश्री  सुमनबाई गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी  दर्गा परिसरात वास्तव्यस असलेल्या  पंधरा महिला व  पुरुषांना दिवाळीची भेट म्हणून मंगळवार (ता.25) रोजी  साडी चोळी व कपडे वाटप करून  निराधारांच्या चेहऱ्यावर आनंदअश्रू  आणले.

गेली दोन वर्षे कोरोना होता त्यामुळे या निराधाराना मदत मिळाली नव्हती. या वर्षी ही मदत पाहून त्यांचे डोळे पाणावले, एक सामाजिक बांधिलकी जपत गौतम गायकवाड यानी हा मदतीचा हात पुढे केला. संकट मोचन मन्दिर समोर बसणाऱ्या निराधाराना ही साडी चोळी व टॉवेल देण्यात आले.