बहुजन समाज पार्टी वैजापूरच्यावतीने राज्यस्तरीय संमेलनाची तयारी

वैजापूर,२५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बहुजन समाज पार्टी वैजापूर विधानसभाच्या वतीने  मंगळवारी येथे बैठक  घेऊन मुंबई  येथे ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या “होऊ शकतं हे” अंतर्गत राज्यस्तरीय संमेलनाच्या जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

गाव तेथे बैठक घेण्यात येणार असून वैजापूर विधानसभा मतदारदारसंघातून दोन हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या बैठकीस बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे, विधानसभा अध्यक्ष संतोष पठारे,शहराध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन, सचिव वाल्मिक पठारे,आप्पासाहेब गायकवाड, पठाण, बाळा पवार, कडू बागुल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.