शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे संवेदनशील पद्धतीने लक्ष द्या – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रशासनाला सूचना 

वैजापूर ,१९ जून/ प्रतिनिधी :- गरजु व नियमांत बसणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांचे मानधन सुरू करा, वृद्ध व निराधार नागरिकांनी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांचे दाखल केलेल्या योग्य अर्जाना लवकरात लवकर मंजुरी द्या तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबतीत संवेदनशील पद्धतीने लक्ष देऊन सकारात्मक दृष्ट्या निराकरण करावे अशा सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला दिल्या.शिवसेना पक्ष व संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवगर्जना “आता जिंकेपर्यंत लढायचं” या संपर्क मोहिमे दरम्यान तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या सूचना  केल्या . 

यावेळी त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी,  संजय पाटील निकम आदी उपस्थित होते.

तालुक्यातील लासुरगाव,बोरसर, शिवूर व वाकला या जिल्हा परिषद विभागांचा त्यांनी 17 जून रोजी दौरा केला.यामध्ये त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच बोरसर येथे शिवसेना शाखेची पुनर्रचना करून कार्यकारी घोषित केली व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.  गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याची तक्रार दानवे यांच्याकडे केली. शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षणाधिकारी यांनी तात्पुरत्या तसेच कायम स्वरुपी करिता या शाळांमध्ये तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी तसेच वैजापूर तालुक्यात असलेल्या विजेच्या भारनियमांची समस्या जलद गतीने सोडविण्याची सुद्धा सूचना यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीला दिल्या.. यावेळी नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, गटविकास अधिकारी  एच.आर.बोयनर, कृषी अधिकारी अशोक आढाव, महावितरण कार्यकारी अभियंता कुंडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, दिनेश मुथा, युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे,विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, प्रशांत शिंदे, अक्षय साठे, किशोर हुमे, प्रविण सोनवणे,  महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई जाधव, उपतालुकाप्रमुख रमेश सावंत, संजय शिंदे, माजी जि.प.उपाध्यक्ष दिनकर पवार, उप तालुकाप्रमुख अरुण शेलार, बाळासाहेब बडक, प्रसिद्धी प्रमुख योगेश मोहिते, माजी उपसभापती सजन शिंदे व शाखाप्रमुख सुदाम जाधव आदी उपस्थित होते.