गोदावरीत बुडून मृत्यू पावलेल्या पालखेड येथील तरुणांच्या कुटुंबियांचे भूमरे यांच्याकडून सांत्वन

वैजापूर ,१८ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील बाबासाहेब अशोक गोरे, शंकर पारसनाथ घोडके, आकाश भागिनाथ गोरे व नागेश दिलीप गोरे हे चारही युवक मागील आठवड्यात मढी येथे यात्रेकरीता जात कायगांव टोका गोदावरी नदी येथे सिध्देश्वर मंदिर परिसरात आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलांचा दैदूर्वी बुडून मृत्यू झाला. 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संदीपान भूमरे व आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शनिवारी (ता.18) पालखेड येथे मृत तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी शिवसेनेच्यावतीने प्रत्येक कूटुंबास वैयक्तिक रोख स्वरुपात 50 हजार रुपये मदत करून धिर दिला व आणखी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.